जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 July 2023

जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू


मुंबई - दहिसर ते मीरा रोड स्थानकादरम्यान जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यास ४ जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणारा आरपीएफ पोलीस दलातील चेतन कुमार याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आज (३१ जुलै) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेस गुजरातमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. ट्रेनने प्रवास करणाऱ्या रेल्वे पोलीस दलातील विमनस्क अवस्थेतील एका कॉन्स्टेबलने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून चौघांचा जीव घेतला. एक्सप्रेस ट्रेन पालघर स्थानक सोडून विरारच्या दिशेने येत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. वापी स्थानकात चेतन सिंह या रेल्वे कॉन्स्टेबलचा बी-५ बोगीतील प्रवाशांशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, चेतन सिंह याने या प्रवाशांवर रिव्हॉल्व्हर रोखली. यावेळी बोगीत असणारे रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक टिकाराम मीणा त्याठिकाणी धावत आले. त्यांनी चेतनची समजूत काढत त्याला प्रवाशांवर गोळ्या झाडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मानसिक तोल सुटलेल्या चेतन सिंह याने पहिले टिकाराम मीणा यांच्यावरच गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

या घटनेपूर्वी चेतन सिंह याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत त्याचा वाद झाला होता. याच रागाच्या भरात चेतनने टिकाराम मीणा यांच्यावर गोळ्या झाडल्या असाव्यात, अशी शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टिकाराम मीणा यांनी यांनी चेतनला आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, चेतनने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे चेतन आणि टिकाराम यांच्यात नेमक्या कोणत्या स्वरुपाचा वाद झाला होता, याची माहिती घेतली जात आहे. चेतनची बदली नुकतीच गुजरातमधून मुंबईला झाली होती. तो लोअर परेल येथील रेल्वे पोलीस दलात रुजू झाला होता. मात्र, बदली झाल्यामुळे चेतनला काही कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागत होता. याच वादातून ही गोळीबाराची घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad