खड्डे तातडीने भरुन नागरिकांना दिलासा द्या - पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्डे तातडीने भरुन नागरिकांना दिलासा द्या - पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

Share This


मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. रस्त्यांवर पावसाने झालेले खड्डे तातडीने भरुन वाहतूक सुरळीत राहील, नागरिकांना दिलासा मिळेल, अशारितीने प्रशासनाने पावले उचलावी व कामांचे नियोजन करावे, असे निर्देश मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिकेला दिले आहेत. खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून मुंबईतील खड्डे एका आठवड्यात बुजविले जातील असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम परवा रात्री पासून सुरु झाले असून याची पाहणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल रात्री केली होती. त्यानंतर त्यांनी आज अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासु यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी मास्टिक तंत्रज्ञानाने खड्डे भरण्यासाठी तातडीने हॉट मास्टिंग मशीन उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्रत्येक विभागासाठी खड्डे बुजविण्यासाठी एक नोडल इंजिनियर नियुक्त करावा. सध्या खड्डे बुजविण्याच्या सुरु झालेल्या कामाचा वेग वाढवावा आणि या आठवड्या अखेरीपर्यंत मुंबईतील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनास दिले.

पालिका आयुक्तांनी आज सर्व अधिकाऱ्यांची तपशीलवार बैठक घेऊन खड्डे बुजवावेत यासाठी अ‍ॅक्शन प्लन तयार केला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांबाबत नागरिकांसाठी एक व्हाट्स अॅप तक्रार क्रमांक आणि अॅप द्वारे तक्रार प्राप्त झाल्यावर २४ तासात खड्डे बुजविले जावेत असेही आदेश दिलेत. प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून मुंबईतील खड्डे एका आठवड्यात बुजविले जातील असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages