घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक

Share This

मुंबई - मुंबई पोलिस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावा, असे पोलिस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. (Landlords are required to report details of tenants on Citizen Portal)

भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल, भांडण घडू नये म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. भाडेकरू परदेशी व्यक्ती असेल, तर घरमालक व परदेशी व्यक्ती यांनी नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्टचा तपशील, व्हीसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण, जारी करण्याची तारीख, वैधता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. हा आदेश ५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेनुसार दंडनीय असेल, असेही पोलिस उपायुक्त ठाकूर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages