तृष्णा विश्वासराव यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2023

तृष्णा विश्वासराव यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश


मुंबई - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या आणि सात वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तृष्णा विश्वासराव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढिसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार आणि शिवसेना सचिव मनीषा कायंदे, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक परमेश्वर कदम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad