Red Alert - मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना उद्या (२७ जुलैला) सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2023

Red Alert - मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना उद्या (२७ जुलैला) सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडा


मुंबई - मुंबईला आज (२६ जुलै) रात्री आठ वाजल्यापासून पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व शाळांना उद्या (२६ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबईत आज (दिनांक २६ जुलै २०२३) रात्री ८ वाजेपासून उद्या (दिनांक २७ जुलै २०२३) दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांनी दरडप्रवण क्षेत्रात आणि धोकादायक इमारत स्थळी आपले पथक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासह तैनात ठेवावे, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, असे निर्देश महारपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी यंत्रणेला दिले आहेत. तसेच मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने प्रत्यक्ष क्षेत्रावर दक्ष राहण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad