चांद्रयान-३ यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2023

चांद्रयान-३ यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले


मुंबई / श्रीहरीकोटा - भारताचे चांद्रयान-३ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी २:३५ वाजता यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. काउंट डाऊन संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच एलव्हीएम-३ मधून चांद्रयान-३ वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. रॉकेटच्या आवाजात टाळ्यासह, भारत माता की जय च्या घोषणाही निनादल्या. देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.

चांद्रयान-३ शुक्रवारी दुपारी २:३५ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो) ने सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान-३ लाँच केले. लाँचनंतरचे पहिले दोन टप्पे यशस्वीपणे पार पडले आहेत. या टप्प्यांमध्ये एस २०० बूस्टर सेप्रेट करणे, आणि पेलोड फायरिंग सेप्रेट करणे यांचा समावेश होता. यानंतर आता क्रायोजेनिक (सीई२५ स्टेज) इंजिन सुरू करण्यात आले आहे. चांद्रयान ३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी विविध शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थी अंतराळ केंद्रात पोहोचले होते. यावेळी अंतराळ केंद्रावर हजारो लोक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad