हॉटेलला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2023

हॉटेलला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू


मुंबई - मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला (Hotel Galaxy Fire) आज आग (Fire) लागली. या आगीत पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. 

मुंबईतील सांताक्रूझच्या गॅलेक्सी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आज (२७ ऑगस्ट) दुपारी १.१७ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यानंतर तात्काळ स्थानिक पोलीस आणि आधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रण करुन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमधून असून पाच जणांना बाहेर काढले असून त्यांना व्ही एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं होत. त्यामधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कळविले आहे. 

मृतांची नावे -
रुपाली कानजी
किशन 
कांतीलाल वारा

जखमी (उपचार सुरू)
अल्पा वखारिया
मंजुळा वखारिया

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS