रायगड जिल्ह्यातील कोलाड इथं राज ठाकरे बोलत होते. गेल्या १५ वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळं अडीच हजार जणांचा मृत्यू झाला. १७ वर्षापासून हा रस्ता का होत नाही, याचे उत्तर म्हणजे तुम्हाला राग येत नाही असे राज ठाकरे म्हणाले. जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
कोकणी बांधवांना गेली अनेक वर्ष खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही. या रस्त्यावर खड्यामुळे किती अपघात झाले असतील किती माणसे गेली असतील. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतही असो. आजचं असो किंवा कालचं असो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेलं नसतं असे राज ठाकरे म्हणाले.
No comments:
Post a Comment