मुंबई - मुंबईच्या मस्जिद आणि ग्रँटरोड स्थानकात युवतींवर अत्याचार झाला होता. ही प्रकरणे ताजी असतानाच उद्यान एक्सप्रेसमधून पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या महिलेची बॅग हिसकावून जखमी करण्यात आले आहे. या चोराला दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (The accused's arrested by Dadar Railway Police)
उद्यान एक्सप्रेसमधून पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलेची रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानक सुटल्यावर एका चोरट्याने रेल्वे डब्यात घुसून बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर महिलेची व चोराची झटापट झाली, आपल्या चोरीचा उद्देश तडीस जाणार नसल्याचे पाहून चोरट्याने सदर महिलेस चक्क चालत्या एक्सप्रेसमधून ढकलून दिले. इतर प्रवाशांमार्फत दादर रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत महिलेला दादर स्थानकात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले. महिलेच्या तक्रारीवरून दादर रेल्वे पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार सीसीटीव्ही फुटेज व इतर माध्यमाद्वारे तपास करून अवघ्या तासाभरात चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
दादर रेल्वे पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा (रजि. क्रमांक ८४७/२०२३ कलम ३०७, ३९४, ३५४ भा दं वि सह कलम १५० (१) (ई), १५३, १३७, १४७, १६२ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत) गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे करीत आहेत.
No comments:
Post a Comment