पालिका कर्मचाऱ्यांचा उद्या ७ ऑगस्टला एम / पूर्व कार्यालयावर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2023

पालिका कर्मचाऱ्यांचा उद्या ७ ऑगस्टला एम / पूर्व कार्यालयावर मोर्चा


मुंबई - महापालिकेच्या एम/पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांना मारहाण, धक्काबुक्की आणि शाईफेक मारहाण करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ उद्या सोमवारी ७ ऑगस्ट रोजी म्युनिसिपल मजदूर युनियनकडून कामगार-कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांचा सकाळी १०.३० वाजता एम / पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. अनिल जाधव यांना मारहाण करणाऱ्यांना अटक झाली नाही, तर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे. या मोर्चात पालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad