मुंबई - 'भारतातील १ बिलियन डॉलर इतकी रक्कम गौतम अदानी यांच्यामार्फत देशाबाहेर नेण्यात आली. या पैशाच्या माध्यमातून अदानींनी आपली शेयर प्राइज वाढवली आणि नंतर तोच पैसा वेगळ्या मार्गाने पुन्हा भारतात आणण्यात आला. याच पैशातून अदानी यांच्या कंपनीने भारतातील विमानतळे आणि इतर ठिकाणी पैसा गुंतवला,' असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची संसदीय समितीद्वारे (JPC) चौकशी करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी मुंबईत आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषेदेत तीन जागतिक वृत्तपत्रांचा दाखला देत गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. अदानी यांच्या सोबत चीनचा नागरिक या व्यवहारात सामील आहे. हे सर्व मिळून शेअर बाजारातील शेअरचे दर निश्चित करत होते असा आरोप गांधी यांनी केला.
या पत्रकार परिषदेत राहुल यांनी ईडी आणि सीबीआयच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. तसंच अदानींविरोधात केल्या गेल्या चौकशीबाबतही शंका उपस्थित केली. गौतम अदानींच्या कंपनीची सेबीद्वारे चौकशी केली होती. या चौकशीत अदानींना क्लिनचीट देण्यात आली होती. काही काळानंतर क्लिनचीट देणाऱ्या अधिकाऱ्याला अदानींच्या कंपनीत संचालक बनवण्यात आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याने अदानींविरोधात केलली चौकशी संशयास्पद असल्याचा आरोप राहुल गांधी केला आहे.
No comments:
Post a Comment