शहापूरमध्ये समृद्धी महामार्गावर क्रेन कोसळून १७ मजुरांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2023

शहापूरमध्ये समृद्धी महामार्गावर क्रेन कोसळून १७ मजुरांचा मृत्यू


ठाणे / शहापूर - समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. बुलढाणा येथील अपघात ताजा असतानाच शहापूर येथे अपघात झाला आहे. शहापूरमध्ये समृद्धी महामार्गावर गर्डर बसवताना क्रेन कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १७ मजुरांचा मृत्यू झाला असून, काहीजण दबले आहेत. एनडीआरएफ व इतर पथकाचे बचावर कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

शहापूर तालुक्यात सरलांबे येथील समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. गर्डन मशिन जॉईंट करणारा क्रेन व स्लॅब शंभर फुटावरून खाली कोसळला. त्या खाली चिरडून १७ जण ठार झाले. इतर तीन जण जखमी असून त्यांना ठाणे येथील कलव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुलाचे बांधकाम रात्रीही सुरू होते, मात्र सुरक्षतेच्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्यामुळे गरीब कामगारांना आपल्या जीवाला मुकावे लागले, असा आरोप होत आहे.

सरकारकडून मदत -
शहापूर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाइकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी २ लाख रुपये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad