मुंबई - दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्हीही सण एकत्र साजरे होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री यांनी २९ सप्टेंबर ला ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी घोषित केल्याबद्दल मंत्री व कॉँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
यासंदर्भात नसीम खान यांनी ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी लेखी पत्राद्वारे मागणी केली होती की, दरवर्षी राज्यात अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्हीही सण मोठ्या जल्लोषात साजरे होत असतात परंतु यावर्षी हे दोन्हीही सण एकाच दिवशी येत असल्याने ०६ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया खिलाफत कमिटी मध्ये मुंबई सहित महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, मालेगाव, भिवंडी, ठाणे व इतर विविध मुस्लिम संघटनाची बैठक घेऊन ईद-ए-मिलाद रोजी काढण्यात येणारी मिरवणूक २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याअनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्र्यानी २९ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी नसीम खान यांनी केली होती. त्यांच्या ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या मुख्यमंत्र्यानी २९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी घोषित केल्याबद्दल नसीम खान यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्याच्या या घोषणामुळे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही दोन्हीही धर्माचे पवित्र असे सण प्रेम व सद्भावणाने आणि मोठ्या जल्लोषात साजरे होतील अशी ग्वाही नसीम खान यांनी दिली.
No comments:
Post a Comment