हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2023

हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक


मुंबई - रेल्वेच्या हार्बर मार्गावर 38 तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक 30 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून 2 ऑक्टोबर 2023 च्या दुपारी एक वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी सीएसएमटीवरून शेवटची लोकल रात्री 9.02 वाजता सुटणार आहे. याची नोंद घेऊन हार्बर मार्गावरील प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बेलापूर आणि पनवेल सेवा बंद -
डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाऊन लाइन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकापर्यंत सुरु असेल. बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा बंद राहील.

शेवटची ट्रेन कधी सुटणार -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन रात्री 9.02 वाजता सुटेल आणि 30.09.2023 रोजी रात्री 10.22 वाजता पनवेलला पोहोचेल. रात्री 10.35 वाजता पनवेलहून सुटेल आणि रात्री 11.54 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून रात्री 9.36 वाजता सुटेल आणि 10.28 वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून सुटणारी शेवटची अप लोकल 9.20 वाजता सुटेल आणि ठाण्याला रात्री 22.12 वाजता पोहोचेल.

ब्लॉकनंतर पहिली ट्रेन -
ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली लोकल ट्रेन दोन ऑक्टोबर रोजी दुपारी 12.08 वाजता सुटेल आणि दुपारी 1.29 वाजता पनवेल येथे पोहोचेल. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेल येथून 1.37 वाजता सुटेल आणि 2.56 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. पहिली लोकल ट्रेन 1.24 वाजता ठाण्याहून सुटेल आणि 2.16 वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेलहून 2.01 वाजता सुटेल आणि ठाण्यात 2.54 वाजता पोहोचेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad