दहा दिवसांच्या ३९२३५ गणेश मूर्तींचे विसर्जन, एका मुलाचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहा दिवसांच्या ३९२३५ गणेश मूर्तींचे विसर्जन, एका मुलाचा मृत्यू

Share This

मुंबई - मुंबईत (२८ सप्टेंबर) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबईत दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन आज (२९ सप्टेंबर) सकाळपर्यंत सुरू होते. पहाटे ६ वाजेपर्यंत ३९ हजार २३५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान जुहू चौपाटी येथे एक मुलगा समुद्रात बुडाला. या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

३९२३५ मूर्तींचे विसर्जन - 
मुंबईत दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. आतापर्यंत दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. दहाव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाची सुरुवात गुरुवारपासून सुरू झाली. शुक्रवारी पहाटे पर्यंत विसर्जन सुरू होते. आज पहाटे ६ वाजेपर्यंत ३९२३५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात ३२१९० घरगुती, ६६०१ सार्वजनिक तर १५९ गौरीच्या मूर्ती होत्या. एकूण ३९२३५ पैकी ११०९७ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. त्यात १०१९८ घरगुती, ७३९ सार्वजनिक तर १६० गौरीच्या मूर्ती होत्या.

एका मुलाचा मृत्यू - 
२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास दहा दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू असताना जुहू चौपाटी येथे एक मुलगा पाण्यात बुडाला. या मुलाला दृष्टी लाईफ गार्डच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. युसुफ शेख असे या मुलाचे नाव असून तो १६ वर्षाचा आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages