मुंबईतील विकासकामे वेळेवर पूर्ण करा - पालकमंत्री दीपक केसरकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2023

मुंबईतील विकासकामे वेळेवर पूर्ण करा - पालकमंत्री दीपक केसरकर


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा देखील शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज आढावा घेतला. ही कामे योग्यप्रकारे आणि वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश प्रशासनाला दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या बैठकीस खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विविध विभागांचे व परिमंडळांचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
    
या बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किचन गार्डन सुरू करणे, मध्यान्ह भोजनात भाजीपाल्याचा योग्यप्रकारे वापर करणे, शाळांच्या इमारतींचे सुशोभीकरण करणे; शाळेतील ग्रंथालयांमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आदी प्रेरणादायी व्यक्तींची आत्मचरित्रं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे; प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राची निर्मिती; बेस्टच्या जुन्या बसेस निकाली काढण्याऐवजी  त्यात बदल करून त्यांचा उपयोग काही ठिकाणी आर्ट गॅलरी, वाचनालये,  रेस्टॉरंट यासाठी करणे करणे, महालक्ष्मी मंदिर परिसर विकास, बेगर होमबद्दलचे धोरण व व्यवस्था करणे, रात्र निवासबाबत नियोजन करणे; वाहनतळ आरक्षण, वाहतुकीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे, विद्यमान उद्याने व क्रीडांगण आरक्षणाचा विकास करणे, झोपडपट्टी वसाहतीत शौचालयांची पुनर्बांधणी करणे, महिलांसाठी पिंक टॉयलेट उभारणे, 'लंडन आय'च्या धर्तीवर 'मुंबई आय'ची निर्मिती करणे आदी कामांचा आढावा घेतला. मुंबईतील नागरिकांचे जनजीवन सुरळीत आणि सुलभ करण्यासाठी ही कामे महत्वाची असून ती योग्यप्रकारे आणि वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश यावेळी केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले.

नागरिकांकडून तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करा - 
पेन्शन, रोजगार, मलबार हिल जलाशय, इमारतींचा पुनर्विकास, विकासकांकडून सुविधांची अपूर्तता आदी विषयांबाबत नागरिकांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे समस्या मांडल्या. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले आहेत, अशी भावना केसरकर यांनी मांडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad