दिशा आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा, न्यायालयात जनहित याचिका दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिशा आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा, न्यायालयात जनहित याचिका दाखल

Share This

मुंबई - शिवसनेचे युवा नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढण्याचा शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha Salian) आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या चौकशीची मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर झाली आहे. लवकरच यावर सुनावणी होणार आहे. (Investigate Aditya Thackeray in the case of Disha and Sushant's death)

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून यावर नुकतीच प्राथमिक सुनावणी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे झाली. लवकरच यावर सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेतून केंद्रीय तपासयंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांवरही ढिलाईनं काम केल्याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या महाधिवक्त्यांना सीबीआयविरोधात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल याचिका दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.

काय आहे याचिका ? -
दिशी सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची का गरज आहे? हे पटवून देताना अनेक आरोप या याचिकेतून करण्यात आलेत. 8 जून 2020 रोजीच दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटिव्ही फुटेज तपासलं जावं. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी.

राहुल कनाल यांचा आदित्य ठाकरेंवर वार -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल यांनी दोन महिन्यांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळा राहुल यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणावर भाष्य केलं. ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल झालेल्या राहुल कनाल यांनी थेट आदित्य ठाकरेंवर पहिला घाव केला होता. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली होती. दिशा सालियान प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना कनाल यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages