अजित पवार पुण्याचे पालकमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

Share This

मुंबई - पुण्याचे पालकमंत्री पद मिळावे म्हणून उप मुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. पुण्याचे पालकमंत्री पद भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. अजित पवार यांनी नुकत्याच पुण्यात बैठका घेतल्या होत्या. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांनी आजारी असल्याचे कारण देत मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली होती. त्यानंतर अजित पवार यांची नाराजी उघड झाली होती. त्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला गेले होते. अजित पवार यांना नाराज करू नका असे आदेश भाजपाकडून देण्यात आले आहेत. त्यानंतर आज राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्री बनवण्यात आले आहे. 

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी - 
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा - सुधीर मुनगंटीवार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages