पालिकेच्या आरोग्यसेविका ४ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2023

पालिकेच्या आरोग्यसेविका ४ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन करणार


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत चार हजार आरोग्यसेविका (सी.एच.व्ही.) कार्यरत आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत न्यायालयीन आदेश देऊन सुध्दा त्यांची महापालिकेकडून अंमलबजावणी केली जात नाही. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 4 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे मोर्चाने येवून ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास आणि सरचिटणीस विदुला पाटील यांनी दिली आहे. महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने पालिका आयुक्तांना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पत्र दिले असून आपल्याला भेट द्यावी अशी मागणी केली आहे.

काय आहेत मागण्या -
1. सन 2015 पासून किमान वेतन देण्याचे न्यायालयाने आदेश देऊनसुध्दा मुंबई महापालिके अमलबजावणी केली नाही.

2. न्यायालयाने भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन देण्याचे आदेश दिले आहेत त्या आदेशाची अमलबजावणी केली जात नाही.

3. प्रसूती रजा, प्रसूती विषयक कायदयाचे फायदे देण्यात येत नाही नाकारली जाते. तसेच इतर रजा

4. सर्व कामगार कायदयाच्या तरतुदी सी. एच. व्ही ना लागू करण्यात येत नाहीत.

5. सी. एच. व्ही. ना आणि त्यांच्या कुटुंबियांना विमा कवच देण्यात दिले जात नाही.

6. आरोग्य सेविकांना वेंडर करण्यात आले आहे ते न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

7. 2016 साली नेमणूक झालेल्या आरोग्य सेविकांना सहा महिन्याने एक दिवसाचा तांत्रिक सेवाखंड दिला जातो तो बंद करावा.

8. आरोग्य सेविकांच्या पगारातून TDS कापण्यात येऊ नये.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad