गायिका वैशाली शिंदे यांच्या निधनाने परिवर्तन चळवळीचा बुलंद आवाज हरपला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2023

गायिका वैशाली शिंदे यांच्या निधनाने परिवर्तन चळवळीचा बुलंद आवाज हरपला


मुंबई - आंबेडकरी चळवळीला जीवन समर्पित केलेल्या गायिका वैशाली शिंदे यांच्या निधनाने परिवर्तन चळवळीचा बुलंद आवाज हरपला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिवगंत लोकगायिका वैशाली शिंदे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. घाटकोपर असल्फा व्हिलेज येथिल वैशाली शिंदे यांच्या निवास स्थानी त्यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेऊन आठवले यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. बर्वे नगर स्मशानभूमी येथे अंत्ययात्रा काढून दिवगंत वैशाली शिंदे यांच्या पार्थीवावर आज अंत्य संस्कार करण्यात आले.

दिवगंत गायिका वैशाली शिंदे या केईएम रुग्णालयात दाखल होत्या. मधुमेहामूळे त्याच्या पायाला गँगरिन झाल्यामुळे त्यांचा एक पाय काढण्यात आला होता. त्यावर मात करुन वैशाली शिंदे या रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहुन गाणे सादर केले होते. मात्र त्यानंतर त्या अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेत होत्या. मधुमेह आणि गँगरिनमुळे त्यांचे त्याचे केईएम रुग्णालयात आज निधन झाले. आज घाटकोपर असल्फा येथे दिवगंत वैशाली शिंदे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यात आठवले, रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, आदि कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

गायिका वैशाली शिंदे या लोकप्रिय गायिका होत्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुर्ण श्रध्दा ठेऊन भिमगीते गात होत्या. त्या प्रखर आणि पहाडी आवाजाच्या गायिका होत्या. आंबेडकरी चळवळीत त्या लोकप्रिय होत्या. गायिका वैशाली शिंदे येंच्या निधनाने आंबेडकरी वळवळीची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना आठवले यांनी व्यक्त केली. येत्या दि.28 ऑक्टोबर रोजी घाटकोपर पश्चिम असल्फा व्हिलेज येथे सायंकाळी दिवंगत वैशाली शिंदे यांची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहिर श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad