मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी तेलंगणात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी तेलंगणात


तेलंगणा / अदिलाबाद - तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोचला असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी तेलंगणात प्रचारासाठी दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या तेलंगणा दौऱ्यानिमित्त भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज हेलिपॅडची पाहणी केली. यावेळी दरेकर यांनी स्टेडीयम येथे विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला असता विद्यार्थ्यांकडून 'मोदी-मोदी' अशा घोषणा देण्यात आल्या. 

भारतीय जनता पार्टीचे अदिलाबाद विधानसभेचे उमेदवार पायल शंकर अण्णा यांच्या प्रचाराकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने आज आ. प्रविण दरेकर यांनी इंद्रप्रिय दर्शनी स्टेडियम येथे जाऊन हेलिपॅडची पाहणी केली. यावेळी तिथे शालेय विद्यार्थी क्रिकेटचा सराव करत होते त्यांच्यासोबत दरेकर यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. त्यानंतर विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी संवाद साधला. सर्व विद्यार्थ्यांनी 'मोदी-मोदी' अशा घोषणा देत युवा वर्गाचा आवाज हा मोदीजीच असल्याचे दाखवून दिले. तर दुसऱ्या खेळपट्टीवर निघत असताना विद्यार्थ्यांना निवडणुकीची हवा काय? असे दरेकर यांनी विचारताच भाजपा, मोदी आणि उमेदवार पायल शंकर अण्णा यांचीच हवा असल्याचे सुतोवाच केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad