नवी मुंबई, पनवेलमध्ये भूकंप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2023

नवी मुंबई, पनवेलमध्ये भूकंप


नवी मुंबई - मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये रविवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्चर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही. (Earthquake in Navi Mumbai, Panvel)

रविवारी सकाळी भूकंपाच्या हादऱ्याने अनेकांच्या घरातील वस्तू काही सेकंदांसाठी हलल्यासारख्या झाल्या. मोठा आवाज झाल्याचे कामोठे येथील नागरिकांनी सांगितले. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नवी मुंबई आणि पनवेलला भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नेमके काय झाले? हे समजून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना काही तास लागले. भूगर्भातून येणारा काही सेकंदांचा आवाज आणि भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पनवेल व नवी मुंबई खाडीलगतच्या इमारतींमधील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली.

वेधशाळेने पनवेल महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ०९.५४ च्या सुमारास नवी मुंबई आणि पनवेलजवळ १५ किलोमीटरच्या आत २.९ रिश्चर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad