भारतीयांना या 19 देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2023

भारतीयांना या 19 देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही


नवी दिल्ली - मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी जाहीर केले आहे की, भारतीय नागरिक १ डिसेंबरपासून व्हिसाशिवाय (VISA) मलेशियामध्ये येऊ शकतात आणि ३० दिवस राहू शकतात. रविवारी पीपल्स जस्टिस पार्टी काँग्रेसला संबोधित करताना अन्वर इब्राहिम यांनी ही घोषणा केली आहे. आता भारतीय नागरिकांना १९ देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. फक्त पासपोर्टच्या आधारे भारतीय नागरिक व्हिसाशिवाय १९ देशांमध्ये जाऊ शकतात.

याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, २६ देशांमध्ये भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध आहे. २५ देशांसाठी ई-व्हिसा मिळवावा लागेल आणि ११ देशांमध्ये प्रवेशासाठी व्हिसा ऑन अरायव्हल किंवा ई-व्हिसा यापैकी एक निवडता येईल. बार्बाडोस, श्रीलंका, नेपाळ, भूतान, डोमिनिका, ग्रेनाडा, हैती, हॉन्गकॉन्ग, मालदीव, मॉरिशियस, मॉन्टसेराट, निऊये आइलैंड, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, सामोआ, सेनेगल, सर्बिया, त्रिनिदाद अँड टोबेगो, थायलंड आणि मलेशिया या देशात भारतीय नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश मिळणार आहे.

गेल्या महिन्यात थायलंडनेही जाहीर केले होते की भारत आणि तैवानमधील पर्यटक सहा महिन्यांसाठी व्हिसाशिवाय येऊ शकतात. ही योजना यावर्षी १० नोव्हेंबर ते १० मे २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन म्हणाल्या होत्या की, “आम्ही भारतीय आणि तैवानी लोकांना व्हिसा फ्री एंट्री देऊ कारण तेथून बरेच लोक आपल्या देशात येतात. आता भारतीय नागरिकांना १९ देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. फक्त पासपोर्टच्या आधारे १९ देशांमध्ये जाऊ येऊ शकते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad