सदावर्ते यांची मलीन प्रतिमा उजळण्यासाठी सरकारची सुपारी - श्रीरंग बरगे यांचा आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2023

सदावर्ते यांची मलीन प्रतिमा उजळण्यासाठी सरकारची सुपारी - श्रीरंग बरगे यांचा आरोप


मुंबई - एसटी महामंडळात एस.टी. कष्टकरी जनसंघाने आज पासून जी काम बंद आंदोलनाची नोटीस दिली होती. त्याला कामगारांचा अजिबात पाठिंबा दिसत न्हवता व तसे एसटी व्यवस्थापनाच्या सुद्धा लक्षात आले होते. आंदोलनाचा फज्जा उडाला होता.तरीही निव्वळ  सदावर्ते यांची प्रतिमा उजळण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी  शासन स्तरावर बैठक घेत सदावर्ते यांची  सुपारी घेतली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

यापूर्वी साडे पाच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप झाला त्यातून कामगारांच्या हातात काहीही पडलेले नाही. त्या वेळी देण्यात आलेली वेतनवाढ ही चुकीची असून त्यात सेवा ज्येष्ठता पाळली गेली नाही. या शिवाय संप कालावधीतील साडे पाच महिन्यांचे वेतन देऊ, वेतन आयोग लागू करू, एसटीचे शासनात विलीनीकरण करू, महागाई भत्त्याचा फरक देऊ अस्या अनेक घोषणा सदावर्ते दांपत्याकडून करण्यात आल्या व त्यातील काहीही कामगारांच्या पदरात पडले नाही. संप काळात विविध पदांच्या बढती खात्या अंतर्गत परीक्षा घेतल्या गेल्या त्या पासून अनेकांना वंचित राहावे लागले.सणा सुदीच्या काळात एसटी बँकेतील कर्जव्यवहार बंद आहेत त्यामुळे सदावर्ते यांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. या शिवाय मराठा आरक्षणाच्या विरोधात वारंवार टीका, विदर्भ, मराठवाडा महाराष्ट्रापासून वेगळा करण्याच्या वल्गना ते वारंवार करीत आहेत. व त्यासाठी एसटी कामगारांचा वापर केला जात आहे. त्यांच्या विरोधात कामगारांसोबत जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर व्हावी या उद्देशाने सरकार कडून वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. त्यातून सदावर्ते यांची मलीन प्रतिमा उजळण्याची सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad