मुंबई - मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या पाणीपट्टीत आठ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबईकरांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे. सध्या पालिकेत प्रशासक राज्य असून नगरसेवक नसल्याने या प्रस्तावावर कोणतेही चर्चा होणार नाही. त्यामुळे मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन हा दरवाढीचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
पाणीपट्टी दरवाढीबाबत आमदार रईस शेख यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात, बृहन्मुंबई महापालिकाने मुंबई शहरांमध्ये पाणीपट्टीत दरवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्याच्या बातम्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाल्या आहेत. महापालिकेने मुंबईकरांच्या पाणीपट्टीत आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव जल अभियंता विभागाकडून आयुक्त तथा प्रशासक म्हणून अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. सादर प्रस्ताव मंजूर झाल्यास १ डिसेंबरपासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई शहरात मुबलक पुरेसा पाणीपुरवठा होत नसून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या स्थिती अत्यंत बिकट असून त्यावर मुंबई शहरातील नागरिक समाधानी नाहीत. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा निर्णय मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. परंतु सदर निर्णयाला सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांचे तीव्र विरोध लक्षात घेता महानगरपालिकेतून पाणी दरात होणारी दरवाढ योग्य नाही. या अगोदर महानगरपालिकेने पाणी दरात वाढ करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पालिकेला दरवाढ करणे शक्य झाले नसल्याचे म्हटले आहे.
सर्वप्रथम पाण्याबाबतच्या समस्यांबाबत ज्या त्रुटी आहेत त्या दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच महापालिकेच्यामार्फत मुंबईत सुशोभीकरण प्रकल्पसाठी १७०० कोटी रुपयांचा खर्च करत असताना पाण्याच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उभा करणे योग्य नाही. बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असून मुंबईतील नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तसेच सध्यास्थिती महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सदर प्रस्ताव चर्चा शिवाय मंजुर करणेही बाबी योग्य होण्यारा नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाणीपट्टीत दरवाढीच्या निर्णयाला समाजवादी पक्षाचा विरोध असल्याचे शेख यांनी पत्रात म्हटले आहे.

No comments:
Post a Comment