... तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असता - आदित्य ठाकरे


मुंबई - मुंबईकरांसाठी लढतोय म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे डिलाईरोडचा पुल बंद ठेवण्यात आला होता. हा पूल नागरिकांसाठी खुला केला आहे. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी लढत असताना गुन्हा दाखल होत असेल तर माझ्या आजोबांना अभिमान वाटला असता अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.  

डिलाईल रोड उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, 
आम्हाला जर म्हणत असतील की आम्ही पूल सुरू केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मग समृद्धी महामार्ग उद्घाटन केलं त्यानंतर जे अपघात झाले, लोकांचा मृत्यू झाला मग आता गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल होत नाहीत. वेळेत काम पूर्ण न केलेल्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आम्ही समोर आणल्यानंतरही 22 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट घातला. आम्ही भ्रष्टाचार समोर आणला आहे. आम्ही लोकांसाठी लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले. तसंच दोन्ही पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे काहीच दिवस राहिले आहेत त्यामुळे राज्यपालांनी लक्ष घालावे अशीही मागणी त्यांनी केली. 

Post a Comment

0 Comments