या सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

या सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

Share This

मुंबई - छटपूजेनिमित्त मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई विभागातील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल स्थानकांवर २४ नोव्हेंबरपर्यंत दर दिवशी काही तासांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या सुट्टीमुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढत आहे. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेत वाढ केली आहे. सीएसएमटी, दादर, एलटीटी स्थानकात आरपीएफ, श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकात सोडायला किंवा स्थानकातून नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसाठी फलाट तिकीट काढावे लागतात. यासह फलाटावर काही काळ थांबण्यासाठी अनेकांकडून फलाट तिकीट घेतले जाते. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढते. परिणामी इतर प्रवाशांना इच्छित फलाटावर, रेल्वेगाडीत पोहचण्यास विलंब होतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३० वाजता, एलटीटी येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ पर्यंत आणि पनवेल येथे रात्री ११ ते रात्री २ वाजेपर्यंत फलाट तिकीट मिळणार नाही. या निर्बंधामधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले आणि महिला प्रवाशासोबत स्थानकावर येणाऱ्या व्यक्तीला यामधून सूट देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages