ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेणार - डॉ. संजय बापेरकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2023

ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेणार - डॉ. संजय बापेरकर


मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या हयातीत “शेंडी धारी व जान्हवे धारी हिंदुत्वाला” विरोध केला. त्यांचा वारसा जपणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या “शेंडी-जाणव्याचे “हिंदुत्व” मान्य नाही या भूमिकेला लाखो आंबेडकरी अनुयायींना पाठींबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळेच भविष्यात भाजपाच्या गुलामीतुन देश वाचणार आहे. म्हणुनच आपण “शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे” पक्षात प्रवेश केल्याचे आम आदमी पार्टीचे प्रवक्ता व कामगार नेते डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे.
      
आम आदमी पार्टीचा “प्रवक्ता”म्हणून त्या पक्षाची भूमिका आपण योग्यप्रकारे मांडली होती. भाजपामध्ये अलिकडेच दाखल झालेले, एका उपमुख्यमंत्र्याची मर्जी सांभाळण्यासाठी उध्दव व आदित्य यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांचा योग्य समाचार घेण्याचे काम निश्चितपणे करु असे डॉ. बापेरकर यांनी पक्षप्रवेशानंतर बोलताना स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad