Corona Update - कोरोनाचे 28 नवीन रुग्ण, राज्यात JN.1 चे 10 रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 December 2023

Corona Update - कोरोनाचे 28 नवीन रुग्ण, राज्यात JN.1 चे 10 रुग्ण


मुंबई - आज राज्यात कोरोनाच्या आज राज्यात २८ नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यात एकूण JN.१ चे १० रुग्ण झाले. सध्या राज्यात XBB.१.१६ ह्या व्हेरीएंटचे १९७२ रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी १९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. १ जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत १३४ कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे. (Corona Virus Update) (Corona JN1)

नव्या २८ रुग्णांची नोंद - 
२४ डिसेंबर रोजी २८ नवीन रुग्णांचे निदान झाले. आज १३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ८०,२३,४३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१८% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,७५,६६,२५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,७२,१६३ (९.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात ११६२ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ५९० RT-PCR चाचणी, ५७२ RAT चाचणी ची नोंद प्रयोगशाळेत झालेली आहे. १५३ सक्रिय रुग्ण आहेत. गृह विलीगीकरणात १४२ (१२.८%) असलेले रुग्ण: १४२ (१२.८%), रुग्णालयात ११ (७.२%) रुग्ण दाखल आहेत. तर ICU मध्ये  ०२ (१.३%) रुग्ण दाखल आहेत. 

JN.१ चे १० रुग्ण -
सध्या राज्यात एकूण JN.१ चे १० रुग्ण झाले. त्यापैकी ठाणे मनपा ५, पुणे मनपा २, पुणे ग्रामीण १, अकोला मनपा १, सिंधुदुर्ग १ रुग्ण आहे. एकूण १० पैकी ८ पुरुष व १ महिला आहेत. या ९ रुग्णांपैकी एक रुग्ण ९ वर्षाचा मुलगा, एक रुग्ण २१ वर्षाची महिला आहे. एक रुग्ण २८ वर्षाचा पुरुष व राहिलेले सर्व रुग्ण ४० वर्षावरील आहेत. यापैकी ८ रुग्णांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. पुण्यातील रुग्ण हा अमेरिका येथून प्रवास करून आला आहे. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणामध्ये होते. ह्या सर्व रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे होती व हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.

१३४ मृत्यु - 
१ जानेवारी २०२३ पासून आज पर्यंत १३४ कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला, त्यापैकी ७०.९०% रुग्ण साठ वर्षा वरील आहेत तर ८४% सहबाधित, १६% सहबाधित नसलेले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.८१% एवढा आहे.

कोविड XBB.१.१६ व्हेरीएंट -
सध्या राज्यात XBB.१.१६ या व्हेरीएंटचे १९७२ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad