Prakash Ambedkar : ...तर वंचित राज्यात 48 जागा लढेल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2023

Prakash Ambedkar : ...तर वंचित राज्यात 48 जागा लढेल


मुंबई - लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, पण वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का नाही? याबाबत साशंकता कायम आहे, त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीला इशारा दिला आहे. वंचित आघाडी 48 जागा लढवणार असल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी पुनरुच्चार केलाय. (While 48 seats will be contested in states)

भाजपविरोधात लढणारे पक्षापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. एकत्र येऊन आणि आक्रमकपणे लढणे अपेक्षित असताना केवळ कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे यांच्यात एकी होणार नाही, त्यामुळे राज्यात 48 जागा लढविण्याची तयारी ठेवा, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. उद्या हे एकत्र येणार नसतील तर आम्हाला 48 च्या 48 जागा आम्ही लढवल्या पाहिजेत आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकारात्मक चर्चा - 
बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा आंबेडकरांच्या मार्गाने जाणारेच त्यांचे नातू आहेत. या देशात संविधान टिकावं, या देशात लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडवला जाऊ नये, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. 
- संजय राऊत

महाविकास आघाडीसोबत यावं - 
वंचित आघाडी आणि काँग्रेस यांची आघाडी व्हावी, अशी बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ही आघाडी झाली तर महाराष्ट्रातल्या सत्तापरिवर्तनाला खूप मोठी संधी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे.  
- विजय वडेट्टीवार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad