राज्यात ८ हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात ८ हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा

Share This

मुंबई - राज्यात अ‍ॅम्ब्युलन्सचा महाघोटाळा (Ambulance Scam) झाला असून ४ हजार कोटींचे टेंडर तब्बल ८ हजार कोटींना काढण्यात आले, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली असून नेमका तो मंत्री आहे तरी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार असून संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

राज्यात सुरू असलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्सचा तब्बल १० वर्षांसाठी ८ हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले. खरंतर कुठलेही टेंडर ३ वर्षांच्या पलिकडे नसते. या टेंडरची कुठल्याही पद्धतीने तपासणी केली, तरी हे काम ४ हजार कोटींच्या वर जाऊ शकत नाही. परंतु, आरोग्य विभागाच्या मंत्र्याने हे टेंडर तब्बल ८ हजार कोटींना काढले. यासाठी एका आयएएस अधिका-याला बदलीचा धाक दाखवून त्याकडून ७ दिवसांत हे काम करून घेण्यात आले. 

अ‍ॅम्ब्युलन्सचे हे टेंडर आरोग्यमंत्र्यांनी मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्याचे काम केले. या टेंडरमधून त्यांना ४ हजार कोटी रुपये कमवायचे आहेत. यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार. राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडणार. सध्या संपूर्ण आरोग्य खातेच भ्रष्टाचारात बुडाले आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. ४ हजार कोटींच्या कामाला ८ हजार कोटी रुपये मोजणे आणि स्वत:च्या जवळच्या नातेवाईकांना देणे, यामध्ये मंत्र्यांची पार्टनरशिप आहे, त्यामुळे हे राज्य अधोगतीकडे चालले आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages