रेल्वे, पालिका शीव रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल बांधणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 January 2024

रेल्वे, पालिका शीव रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल बांधणार


मुंबई - शीव रेल्वे स्थानकाजवळचा पूल धोकादायक झाला आहे. तसेच तो नव्या रेल्वे लाईनच्या मध्ये येत आहे. यासाठी हा जुना पूल मध्य रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका पडणार आहे. हा जुना पूल पाडल्यावर त्याच जागी नवा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. २० जानेवारीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार असून २४ महिन्यात नवा पूल बांधला जाणार आहे.  


समन्वयाने शीव रेल्वे स्थानकाजवळ केएम १२/१०-११ येथे विद्यमान रस्ते उड्डाणपूलच्या जागी नवीन उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची योजना आखली आहे.  प्रकल्पाच्या खर्चासाठीचे २३ कोटी रुपये मध्य रेल्वे तर २६ कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिका उचलणार आहेत.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये विद्यमान उड्डाणपूल तोडण्याची, त्याजागी स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह जुन्या उड्डाणपूलाच्या जागी नवीन शीव उड्डाणपूल पुनर्बांधणी करण्याची शिफारस केली. तसेच, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामात अडथळा निर्माण करत आहे त्यामुळे जुना उड्डाणपूल पाडून पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.  

पूल पाडल्यावर येथील वाहतूक बंद होणार आहे. वाहतूक बंद केल्यानंतर २४ महिन्यांच्या आत हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचा मानस आहे. सध्या  २० जानेवारी २०२४ पासून वाहतूक पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. २० जानेवारीपासून उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू होईल. हे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने आणि वाहतूक शाखेच्या मदतीने केले जाईल. 

असा असेल नवा पूल - 
प्रस्तावित नवीन उड्डाणपूल हा ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा पूल असेल. प्रकल्पाच्या खर्चासाठीचे २३ कोटी रुपये मध्य रेल्वे तर २६ कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिका उचलणार आहेत.  

हा उड्डाणपूल पाडण्यासाठी लवकरच पायाभूत सुविधांचे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ज्याची माहिती लवकरच नागरिकांना कळविण्यात येईल. तसेच हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी या महत्‍त्‍वाच्‍या कामासाठी सहकार्य करावे अशी विनंती रेल्‍वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad