राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Share This

मुंबई - २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अधिकाधिक लोकांना पाहता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. या सोहळ्याचे प्रक्षेपण पाहता यावे आणि या सोहळ्यात सहभागी होता यावे म्हणून केंद्र सरकारने देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था, कार्यालयांमध्ये दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. २२ जानेवारीला पूर्ण दिवस सुट्टी द्यावी अशी मागणी केली जात होती. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे.   

अशी आहे मूर्ती - 
आज गुरुवारी (१९ जानेवारीला) मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लांची मूर्ती आसनावर स्थानापन्न करण्यात आली. आता या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी ५१ इंच उंची असलेली प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages