पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा १५ जानेवारीपासून संपाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2024

पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा १५ जानेवारीपासून संपाचा इशारा


मुंबई - निवासी डॉक्टरांच्या बाँड सेवेबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. या पत्रकानुसार BMC वरिष्ठ निवासी (Senior Resident) आणि हाऊस ऑफिसर (House Officer) यांची महाराष्ट्र राज्यासाठी बंधपत्रित सेवा म्हणून मान्यता रद्द केली आहे. याचा निषेध म्हणून हे परिपत्रक मागे घ्यावे अन्यथा १५ जानेवारीपासून निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जातील असा इशारा बीएमसी मार्ड या संघटनेकडून देण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या कूपर, केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात १४०० निवासी डॉक्टर सेवा देत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जीआर (क्रमांक एमईडी 1017/प्र.क्र. 455/17/त्रशक्षण-2 दिनांक 12 जून, 2018) नुसार, महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणारी सर्व पदे शासनाकडे बंधपत्रित सेवा म्हणून ओळखली जातील. तथापि, सचिव, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र सरकार यांनी जारी केलेली नोटीस, (पत्र क्रमांक एमईडी-१०२३/प्र.क्र.३३४/शिक्षण-२ दिनांक १८/०८/२०२३) विशेषतः बीएमसी रुग्णालयातील वरिष्ठ निवासी आणि हाऊस ऑफिसर पदांची बंधपत्रित सेवा रद्द करते. बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयांवर केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच देशभरातील रुग्णांचा भार आहे. यामुळे निवासी डॉक्टर सतत मानसिक तणावाखाली काम करत आहेत अशी माहिती मार्डच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रवीण ढगे यांनी दिली.

राज्य सरकारने पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पदांसाठी बंधपत्रित सेवा म्हणून वरिष्ठ निवासी (Senior Resident) आणि हाऊस ऑफिसर पदांची मान्यता रद्द केल्यामुळे डॉक्टरांची या पदावर नियुक्ती होणार नाही. सुमारे ३५ टक्के पदव्युत्तर विद्यार्थी त्यांच्या संस्थांपासून दूर जिल्हा रेसिडेन्सी प्रोग्राममध्ये गुंतलेले असल्याने आणि नवीन SR आणि HO उमेदवार सामील न झाल्यामुळे, BMC वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांचा भार प्रचंड वाढेल. यामुळे बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णसेवेला मोठ्या प्रमाणात अडथळा होण्याची शक्यता आहे. यामुळे निवासी डॉक्टरांच्या कामाच्या तासांमध्ये आणि मानसिक दडपणातही भर पडण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य ना झाल्यास १५ जानेवारी २०२४ पासून निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जातील असा इशारा डॉ. ढगे यांनी दिला आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या -
1. सचिव, वैद्यकीय शिक्षण, पत्र क्रमांक एमईडी-१०२३/प्र.क्र.३३४/शिक्षण-२ दिनांक १८/०८/२०२३ ची सूचना रद्दबातल मानली जावी.
2. महाराष्ट्र सरकारच्या GR क्रमांक एमईडी 1017/प्र.क्र.455/17/त्रशक्षण-2 दिनांक 12 जून, 2018 नुसार BMC संस्थांमधील SR आणि HO पदांना बाँड सेवा म्हणून गणले जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad