ट्रक चालकांच्या आंदोलनाला पनवेलमध्ये हिंसक वळण


मुंबई / नवी मुंबई/ पनवेल - देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. वाहन चालक अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला रस्त्यावर टाकून पळून जातात. यामुळे जखमी व्यक्तीचा मृत्यूही होतो. हे प्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा व दंड आकारला जाणार आहे. या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक आज रस्त्यावर उतरले होते. व त्यांनी कळंबोली सर्कल परिसरातील मार्ग ठप्प केला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती.

रस्ते अपघातात ज्या गाडीने धडक मारली त्यातील लोकांनी अपघातग्रस्तास मदत केली नाही तर त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा व दंड वसूल करण्याचा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याला विरोध करत ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी आज कळंबोली सर्कल येथे जाणारा मार्ग रोखून आंदोलन छेडले. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या ठिकाणी आंदोलन केले असता सरकारला जाग येईल या उद्देशाने कळंबोली सर्कल येथे तेथील ट्रक चालक व मालकांनी रास्ता रोको करत रस्त्यावरून जाणारी अवजड वाहने सुद्धा त्यांनी थांबवली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी संतप्त ट्रक चालक व मालकांनी केंद्र सरकारच्या या नवीन कायद्याविरोधात घोषणा दिल्या. तसेच पोलिसांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. 

केंद्र सरकारविरोधात ट्रक चालकांनी नवी मुंबईतल्या जेएनपीटी मार्गावरील आंदोलनाला हिंसक वळण लागले. ट्रक आणि डंपर चालकांनी रस्त्यावर वाहने उभी केल्याने पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काहीजण बांबू घेऊन पोलिसांच्या मागे लागले. यावेळी पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेमध्ये काही पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment

0 Comments