दोन पाईपलाईन फुटल्या, सायन कोळीवाडा, वडाळ्यात पाणी पुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2024

दोन पाईपलाईन फुटल्या, सायन कोळीवाडा, वडाळ्यात पाणी पुरवठा बंद


मुंबई - सायन कोळीवाडा (Sion Koliwada) सी जी एस कॉलनी (CGHS Collony) येथे मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या दोन पाईपलाईन फुटल्या (Pipe lines burst) आहेत. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी सायन कोळीवाडा, वडाळा आदी विभागात पाणी पुरवठा बंद (water cut) करण्यात आला आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाईल अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून (Bmc Water Department) देण्यात आली आहे.

रावजी गणात्रा मार्ग जंक्शन शेख मिसरी मार्ग, सी जी एस कॉलनी सेक्टर ६ जवळ, ६०० मीलीमीटर व ३०० मीलीमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या फुटल्या आहे. सदर जलवाहिनींच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर घेण्यात आलेले आहे. सदर दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास अंदाजे २४ तासाचा कालावधी लागेल. त्यामुळे सी जी एस कॉलनी, महात्मा गांधी नगर, कोकरी आगर, भारतीय कमला नगर, विजय नगर, संगम नगर, दोस्ती एकर्स, हिम्मत नगर, शांती नगर, आझाद मोहल्ला, अंटोप हिल, वडाळा पूर्व, गणेश नगर, शिवशंकर नगर, नेहरू नगर , इंदिरा नगर, वडाळा ट्रान्झिट कॅम्प, पंजाबी कॉलनी, सेवा समिती, म्हाडा कॉलनी, सायन कोळीवाडा, येथे पाणी पुरवठा होणार नाही ह्याची नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन एफ उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता जलकामे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad