Mumbai News - मुंबईत उद्या (१९ मार्च) १५ टक्‍के पाणीकपात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News - मुंबईत उद्या (१९ मार्च) १५ टक्‍के पाणीकपात

Share This

 

मुंबई - पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लाडर मध्ये शनिवार, दिनांक १६ मार्च २०२४ रोजी अचानक बिघाड झाल्‍याने पाणी गळती सुरू झाली. सदर ब्लाडर ची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटर पर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. तदनंतर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्‍तीचे काम सोमवार १८ मार्च रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले. भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले आहे मात्र, बंधा-याची पाणी पातळी पूर्ववत होण्‍याकरिता कालावधी लागणार असल्‍याने मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्‍या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के पाणीकपात (Water Cut in Mumbai) केली जाणार आहे. (Mumbai Latest News)

भातसा धरणातून सोडण्‍यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्‍ये साठविले जाते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशया मार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. पिसे बंधा-याच्‍या गेटमधील रबरी ब्लाडर मधून दिनांक १६ मार्च २०२४ रोजी अचानक बिघाड झाला. त्‍यातून पाणी गळती झाली. बंधा-यातील पाणीपातळी ३१ मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले. सोमवार, दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरूस्‍तीचे काम पूर्ण करण्‍यात आले.

भातसा धरणातून पिसे बंधा-यासाठी पाणी सोडण्‍यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर आहे. त्‍यामुळे पिसे बंधा-यातील पाणी पातळी वाढण्‍यास कालावधी लागणार आहे. बंधा-याची पाणीपातळी पूर्ववत होईपर्यंत म्‍हणजेच मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजीच्‍या म्हणजे एक दिवस पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात करण्‍यात येणार आहे. याची दखल घेऊन नागरिकांनी पाण्‍याचा जपून व काटकसरीने वापर करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages