Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अमरावतीमधून आनंदराज आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार

 

अमरावती - भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना विरोध करत बच्चू कडू यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अशातच आता आणखी एका बड्या नेत्याने अमरावती लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शनिवारी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे अमरावतीची लोकसभा मतदारसंघाची (Amravati Loksabha) लढत रंगतदार होणार आहे. (Anandraj Ambedkar will contest the Lok Sabha elections from Amravati)

अमरावतीमधील सामान्य जनता, वेगळा विदर्भ संघटना आणि स्थानिक जनतेने आमच्या मतदारसंघात नवी चेहरा वेगळा विचार घेऊन येऊ शकतो, असे मला सांगितले. त्यासाठी मला तिकडच्या अनेक लोकांनी फोन केले. त्यांनी मला लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची विनंती केली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 2 मे रोजी मी अमरावतीमधून लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे आता आनंदराज आंबेडकर मैदानात उतरल्यास आंबेडकरी मतांची विभागणी होऊ शकते, अशी चर्चा आहे. याविषयी विचारले असता आनंदराज आंबेडकर यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. मला वंचितच्या कार्यकर्त्यांनीच अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली. प्रकाश आंबेडकरांकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराबाबत वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आंबेडकर या नावाला वलय आहे. त्यामुळे आंबेडकर जेव्हा निवडणुकीला उभे राहतात तेव्हा समाज त्यांच्या पाठिशी असतो. आंबेडकर कोणत्याही पक्षातर्फे उभे राहिले तरी फरक पडत नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले.

बहुजन संग्रामचा पाठिंबा -
रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इंदू मिल स्मारक लढ्याचे नायक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती येथे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी आनंदराज यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीच्या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनीही पाठिंबा देवून लोकसभेत निवडून पाठवावे, असे आवाहन चिलगावकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom