तर गाव तिथे बार! आनंदाच्या शिध्यात बिअर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तर गाव तिथे बार! आनंदाच्या शिध्यात बिअर

Share This


चंद्रपूर / मुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांकडून, उमेदवारांकडून मतदारांना आश्वासने दिली जात आहेत. अशात लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराच्या आश्वासनामुळे मतदार आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून एकूण पंधरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. मात्र सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. वनिता राऊत या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावच्या रहिवासी आहेत. खासदार झाले तर गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ असे आश्वासन दिले आहे. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर दारिद्र्यरेषेखाली नागरिकांना आनंदाच्या शिध्यामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे मतदार किती आकर्षित होतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोण आहेत वनिता राऊत -
वनिता राऊत यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी उठवून ठिकठिकाणी दारूची दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी केली होती. गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण त्यांचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages