Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुकीची १६ मार्च रोजी घोषणा


नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा शनिवार १६ मार्च नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा शनिवार १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने शुक्रवारी जारी करण्यात आली आहे. (Loksabha Elelction 2024)

निवडणूकीचे किती टप्पे असणार, कशाप्रकारे नियोजन करणार याविषयीची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेत कळणार आहे. दरम्यान कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सर्वात पहिला शब्द कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता. देशामध्ये लोकशाहीचा गाभा टिकून राहावा यासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होणे आवश्यकता असते. त्यासाठी निवडणूक आयोग नावाची एक वेगळी यंत्रणा कामाला लागलेली असते. निवडणूक आयोगाकडून मुक्त निवडणुका व्हाव्यात, निवडणुकीच्या माध्यमातून ख-या अर्थाने लोकांचे मत दिसावे यासाठी काही नियम केलेले असतात. एकदा का निवडणूक जाहीर झाली की हे नियम म्हणजे आदर्श आचारसंहिता लागू होते. ही आचारसंहिता सर्व पक्षांना आणि निवडणुकीत सहभागी होणा-या सर्व उमेदवारांना लागू असते. या नियमांचे पालन करणं बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते.

आचारसंहितेच्या अंतर्गत काही नियम ठरवले जातात आणि ते सर्व नियम हे संबंधित राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाळावे लागतात. निवडणूक आचारसंहिता निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच लागू होते आणि निवडणुका संपेपर्यंत सुरू राहते. निवडणुकीच्या आचारसंहितेबद्दल अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडताना दिसत असतात. आचारसंहिता म्हणजे नेमकी काय, त्याचे नियम काय, त्याचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत.रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने शुक्रवारी जारी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom