Mega Block - रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mega Block - रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक

Share This


मुंबई - रविवार १० मार्च २०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर  मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचवी व सहावी लाईनवर सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत तर हार्बर रेल्वेवर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या - येणाऱ्या डाऊन आणि अप मेल, एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने चालतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

डाऊन हार्बर लाईनवर -
पनवेलसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ वाजता सुटेल. वाशीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. पनवेलसाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३६ वाजता सुटेल.

अप हार्बर लाईनवर -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.३३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल वाशी येथून दुपारी ४.१९ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.१० वाजता सुटणार आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मानखुर्द सेक्शनवर विशेष  गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या कालावधीत ट्रान्स हार्बर, मुख्य मार्गांवर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages