Blood Donation - सायन रुग्णालयात 130 महिला कर्मचाऱ्यांचे रक्तदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 March 2024

Blood Donation - सायन रुग्णालयात 130 महिला कर्मचाऱ्यांचे रक्तदान


मुंबई (जेपीएन न्यूज) - आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे (Women's Day) औचित्य साधत मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) महिला कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले. यावेळी सायन रुग्णालयातील 130 महिला कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे एका चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करून सायन रुग्णालयाने नवा पायंडा पाडला आहे. 

आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असताना रक्तदानासाठी त्यांनी पुढे यावे यासाठी महिलांनीच रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिक्षित होतं तसेच एका महिलेने रक्तदान केले तर सर्व कुटुंब रक्तदानासाठी प्रेरित होतील या विश्वासाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायन रुग्णालयातील ब्लड बँकमधील सफाई कर्मचारी इंदुताई कांबळे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात सायन रुग्णालयातील 130 महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. मोहन जोशी यांनी हे या शिबिराला विशेष करून उपस्थित होते. ब्लड बँकच्या प्रभारी डॉ. कविता सावंत आणि रक्तपेढीच्या टीमने हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

छोटा बाजार दिन - 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सायन रुग्णालयात छोटा बाजार दिन उपक्रम आयोजित करण्यात आला होता.  केवळ महिलांनी रक्तदान केले. या व्यापार प्रदर्शनात अनेक महिलांनी खाण्याचे पदार्थ, लोणचे, पापड इत्यादींचे स्टॉल लावण्यात आले होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad