लोकसभा निवडणुकीत ड्रग्स आणि पैशांचा पाऊस!, 4658 कोटी जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकसभा निवडणुकीत ड्रग्स आणि पैशांचा पाऊस!, 4658 कोटी जप्त

Share This


नवी दिल्ली / मुंबई - निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर आणि वाटप केलं जातं असं म्हटलं जात. याचाच प्रत्यय सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान समोर आलाय. देशात लोकसभा निवडणूकीसाठी सात टप्प्यात मतदान होत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये 4 हजार 658 कोटी 13 लाख रुपये जप्त केले आहेत. भारतामध्ये 1952 सालापासून सुरु झालेल्या निवडणुकीच्या इतिहासाचा विचार करता मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

देशभरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडण्याआधीपर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवायांसंदर्भातील धक्कादायक तपशील दिला आहे. 2019 च्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाने एकूण 3 हजार 475 कोटी रुपये जप्त केले होते. २०२४ मध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये 4 हजार 658 कोटी 13 लाख रुपये जप्त केले आहेत. यामध्ये रोख रक्कमेबरोबरच सोने-चांदी, दारु, अंमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी 44 टक्के वाटा हा अंमली पदार्थांचा असल्याचंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यंदाच्या निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या रक्कमेची सरासरी काढली तर रोज 100 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages