आमच्यासाठी कचाकच बटन दाबा, नाहीतर…इंदापूर - उपमुख्यंमत्री अजित पवार हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. आज त्यांनी इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या सभेमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केले असून सध्या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest marathi news)

“तुम्हाला काय लागेल तो निधी आम्ही द्यायला सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतोय तशी आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकचा बटन दाबा. म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं वाटेल. नाही तर माझा हात आखडता येईल,” असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता सगळीकडे चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

“ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी मी कामे केली आणि करतो आहे. पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25/50 वर्षांचा विचार करा. बारामतीत कामाला आदर देतात. पण भरत शहा यांनी टनदिशी उडी मारली. इतकं करून ते गेले असे काय घडले? आताच निवडणूक वेळी जायचं होतं का? मी काल त्याच्याशी बोललो होतो,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments