उत्तर जपानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उत्तर जपानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप

Share This

जपान - जपान भूकंपाच्या धक्क्याने (Earthquake) हादरला आहे. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात मंगळवारी (२ एप्रिल) ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तर किनारपट्टी भाग होता. जपानच्या हवामान केंद्रानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तरेकडील किनारपट्टीचा भाग होता.

जपानी मीडियाच्या वृत्तानुसार, सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. हवामान खात्याने सुनामीबाबत कोणताही इशारा दिला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला (1 जानेवारी 2024) 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages