पुणे / मुंबई - मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेवू नये असा निर्णय सरकारने घेतला होता. यामुळे विद्यार्थी नापास होत नव्हते. आता या निर्णयात सरकारकडून बदल करण्यात आले आहेत. नव्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीची परीक्षा होणार असून, यात गुणवत्ता नसेल तर अशा विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार आहे. विद्यार्थी नापास झाल्यास पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलीय. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना अभ्यास करून पास व्हावे लागणार आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या (आरटीई) कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु विद्यार्थ्यांना नापास मात्र करता येत नव्हते. आता नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडला तर त्याला नापास करावेच लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणे बंद होणार आहे. जर विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला जूनमध्ये पुन्हा पुरवणी परीक्षा देता येणार आहे. पाचवी ते आठवीसाठी एप्रिलमध्ये परीक्षा होईल. पाचवी व सहावीसाठी भाषा, गणित व परिसर अभ्यास तर सातवी, आठवीसाठी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांचे पेपर असतील. मूळ परीक्षेत ग्रेस गुण मिळूनही नापास झाल्यास जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी परीक्षा होईल. त्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. पुरवणी परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्याला नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागेल. पुरवणी परीक्षेतदेखील परीक्षेतदेखील संबंधित विद्यार्थी नापास झाल्यास तो नापासच राहणार आहे.
इयत्ता 1 ली ते 8 वीची परीक्षा होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालढकल होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेन्शन नव्हते. मात्र आता त्यांना पास होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याच वर्गात बसावं लागणार आहे.
No comments:
Post a Comment