सुरत महाराष्ट्र का लुटत आहे? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2024

सुरत महाराष्ट्र का लुटत आहे?


मुंबई - गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचा पहिला विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Marathi Latest News)

गद्दारांना सुरत सुरक्षित का वाटली? ज्या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. ती सुरत महाराष्ट्र का लुटत आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे हे नांदेडमध्ये आले होते. मात्र, वेळेच्या अभावी त्यांनी सभा घेण्याऐवजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत. त्यांनी ज्यांची वाट अडवून ठेवली होती, त्यांना आता संधी मिळत आहे. आमच्याकडेही काही सुभेदा-या निर्माण झाल्या होत्या. ते गेले आणि नवीन लोकांना संधी मिळाली. तसेच अशोक चव्हाण तिकडे गेल्याने काँग्रेसला नवचैतन्य निर्माण झाले आहे. नेते मोठे झाले की केले तरी जनता कधीच गद्दार होत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आदर्श घोटाळ्याचा निकाल अजूनही लागला नाही. त्यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतले आणि त्यांना राज्यसभेत पाठवले. चव्हाण यांनी शहिदांच्या कुटुंबाला फसवले असे तुम्ही तेव्हा म्हणत होता. याचा अर्थ तुम्ही शहिदांना फसवणा-या लोकांमध्ये सामील झाला आहात, असा टोला त्यांनी लगावला.

आलेली स्क्रिप्ट वाचतात -
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. मी घटनाबा लोकांवर बोलत नाही. त्यांना सकाळी स्क्रिप्ट येते, ते कण्हून कण्हून बोलतात. कुंथून कुंथून बोलतात. लोक त्यांना काय म्हणत आहेत ते जनतेत गेल्यावर कळते, असा टोला त्यांनी लगावला.

घरकाम करणा-यांनाही सुरक्षा -
पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरूनही त्यांनी जोरदार टीका केली. घरात काम करणा-यांना या सरकारने झेड प्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वा-यावर पडली आहे. महिला सुरक्षित नाहीत. सलमानच्या घरावर गोळीबार होतो. त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. लोकांची सुरक्षा वा-यावर आहे. पण गद्दारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत.असा हल्ला त्यांनी चढवला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad