उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात किर्तीकर विरुद्ध वायकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात किर्तीकर विरुद्ध वायकर

Share This


मुंबई - उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीमधील शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याचा सस्पेन्स गेले काही दिवस कायम होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर विरुद्ध रविंद्र वायकर असा थेट सामना होणार आहे.

रवींद्र वायकर हे ठाकरे गटात असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आरोप केले होते. या प्रकरणात वायकरांची ईडी चौकशी सुरू आहे. 9 जानेवारी 2023 रोजी ईडीने वायकरांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला होता. तसंच 'मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अमोल कीर्तिकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार -
आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहे. मी ५० वर्षापासून शिवसेनेत आहे. १९७४ पासून आतापर्यंत माझी कारकिर्द आहे. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. राजकारणात बदल होत असतो, बदल कोण काय घडवेल माहिती नाही. बदल हा विधीलिखित असतो. नवीन उमेदवाराला प्रचाराला वेळ द्यावा लागतो, मी २० वर्ष नगरसेवक होतो. त्यात शिक्षण समिती, त्यातून केलेली कामे, स्थायी समितीतून कामे केली आहे. जोगेश्वरीला ट्रॉमा सेंटर उभारलं आहे. मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा केला आहे. माझ्या काळात तोट्यात असलेली महापालिका मी नफ्यात आणली. पहिल्यांदाच ४ टर्म मला स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं. मी सतत काम करत गेलो. २० हजार कोटी नफ्यात महापालिका आणली. या कामाचं कौतुक अनेकांनी केले. विधानसभेतही मी बॅटिंग केली आहे. उच्च शिक्षणापासून सर्व खात्यात मी काम केले आहे. वायकर म्हणजे काम असा हा ब्रँड आहे. ४ वेळा नगरसेवक आणि ३ वेळा आमदार आहे. माझा प्रचार ३५ वर्ष सुरू आहे. माझा बँकग्राऊंड लोकांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले.

मी उद्धव ठाकरेंना सरळ करू शकतो -
किरीट सोमय्या म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाचा खूप लहान कार्यकर्ता आहे. मी ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना नामदार आहे, ना कोणताही पदाधिकारी. मी पक्षाचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता असून मला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. मी उद्धव ठाकरेंना सरळ करू शकतो, पण पक्षाची जी शिस्त आहे त्याच्या बाहेर एक शब्दही बोलू शकत नाही. मी आतापर्यंत जे काम केलंय त्याचा माझ्या परिवाराला, सहकाऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला अभिमान आहे.
- किरीट सोमय्या

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages