CSMT स्टेशनला पुन्हा लोकल घसरली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2024

CSMT स्टेशनला पुन्हा लोकल घसरली


मुंबई - या आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी पनवेलहून आलेल्या लोकल ट्रेनचा डबा सीएसएमटी रेल्वे स्थानकात शिरताना रुळावरून घसरला. यामुळे हार्बर मार्गावरील (Harbor Railway) वाहतूक विस्कळीत झाली होती. आज बुधवारी पुन्हा त्याच ठिकाणी लोकल घसरली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज १ मे असल्याने कार्यालयांना सुट्टी असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला नाही. (Mumbai Latest News) (Marathi Tajya Batmya)     

चाचणीदरम्यान लोकल ट्रेन रुळावरून घसरली -   
सोमवारी ट्रेनच्या चाचणीदरम्यान लोकल ट्रेन रुळावरून घसरली होती. या घटनेत सुधारणा करण्यासाठी पुन्हा आज चाचणी घेण्यात आली. यावेळी एका रिकाम्या ट्रेनची चाचणी सुरु होती. पण सुरुवातीचा रुळाचा जो दोष होता तो पूर्णपणे निघू शकला नाही. त्यामुळे पुन्हा चाचणीदरम्यान रेल्वे रुळावरून घसरली.आज सकाळपासून ही चाचणी घेतली जात होती. ही चाचणी रात्रीच्या वेळी करता येत नाही कारण त्याचा परिणाम हा दिवसाचा कळतो. ट्रॅकवर कुठे दबाव येतो हे दिवसाच कळू शकते, हीच बाब तपासताना चाचणी घेण्यात येणारी लोकलचा डबा हा रुळावरून घसरला. त्यामुळं आजची चाचणी ही यशस्वी होऊ शकलेली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली

या आधीही झाला होता अपघात - 
सोमवारी हार्बर मार्गावर (Harbor Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिरणाऱ्या पनवेल-सीएसएमटी लोकलचा डबा सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शिरताना घसरला. यावेळी लोकलचा वेग ताशी १५ किमी इतका असल्यामुळे सुदैवाने या अपघात कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. हार्बर मार्गावरील सेवा वडाळ्यापासून आणि वडाळ्यापर्यंत सुरू होत्या. लोकल वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम वेगात सुरू होते. अखेर दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. या घटनेमुळे मुख्य मार्गावरील सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad