३१ मे २०१८ आणि २५ एप्रिल २०२४ दरम्यान प्रकाशित झालेल्या गूगल जाहिरातींमध्ये भाजपचा वाटा, एकूण खर्चाच्या सुमारे २६ टक्के म्हणजेच ३९० कोटी रुपये आहे. भाजपची जाहिरात राजकीय जाहिरात म्हणून वर्गीकृतवर केली जाते. गूगलने राजकीय जाहिराती म्हणून वर्णन केलेल्या एकूण २१७,९९२ एकूण कंटेंटमध्ये ७३ टक्के वाटा हा भाजपचा आहे. यामध्ये भाजपने १६१,००० हून अधिक जाहिरात कंटेट प्रकाशित केला आहे.
भाजपच्या जाहिरातींसाठी कर्नाटकमध्ये १०.८ कोटी रुपये, त्यानंतर उत्तर प्रदेशात १०.३ कोटी रुपये, राजस्थानमध्ये ८.५ कोटी आणि दिल्लीत ७.६ कोटी रुपये खर्च केले आहेत. एकंदरीत गूगल जाहिरातींमध्ये भाजपसह सर्व राजकीय पक्षांचे जाहिरातींचे सर्वाधिक लक्ष्य तामिळनाडू होते, त्यानंतर तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये डिजिटल जाहिरातीचे प्रमाण जास्त पाहायला मिळाले.
काँग्रेसचा ४५ कोटी खर्च -
गूगल जाहिराती आणि गूगल डिस्प्ले आणि व्हिडीओ ३६० वर राजकीय जाहिरातींवरील खर्चाच्या बाबतीत काँग्रेस ४५ कोटी रुपयांसह दुस-या क्रमांकावर आहे. काँग्रेस पक्षाने या कालावधीत ५९९२ ऑनलाइन जाहिराती प्रकाशित केल्या, ज्याचे प्रमाण भाजपने प्रकाशित केलेल्या जाहिरातींच्या फक्त ३.७ टक्के आहे. काँग्रेसची जाहिरात मोहीम प्रामुख्याने कर्नाटक आणि तेलंगणा येथे होती, जिथे प्रत्येकी ९.६ कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर मध्य प्रदेश ६.३ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले.
No comments:
Post a Comment